आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगवी पोलिसांची कारवाई:1 लाखांचा 35 किलो गांजा जप्त ; शिरपूर तालुक्यातील वकवाडची घटना

शिरपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वकवाड शिवारातील वनजमिनीवर तब्बल ३५ किलो वजनाचा १ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. वकवाड शिवारात असलेल्या एका वनजमिनीवर गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती सांगवी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली. वकवाड शिवारात वनजमिनीवर वनसिंग उर्फ वनाश्या सरदार पावरा (वय ३५ रा. वकवाड) याने बेकायदेशीररीत्या लागवड केली होती. तसेच या गांजासदृश वनस्पतीच्या झाडांची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाढवताना मिळून आला. त्याला पोलिस कारवाईची चाहूल लागताच तो तेथून पळून गेला. यावेळी पोसई भिकाजी पाटील, पोसई संदीप पाटील उपस्थित होते. संशयित आरोपीचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी दिली. यावेळी १ लाख १० हजार रुपये किंमत असलेली गांजाची वनस्पती मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी चत्तरसिंग लखा खसावद यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.