आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी‎:रनाळे येथे आरोग्य शिबिरामध्ये‎ 350 वर रुग्णांची केली तपासणी‎

रनाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रनाळा‎ येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात ‎ सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय ‎आरोग्य अभियान अंतर्गत व माता ‎सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान ‎अंतर्गत शिबिर झाले. यात रुग्णांच्या ‎आरोग्याची तपासणी करण्यात‎ आली.‎ खासदार डॉ. हीना गावित यांच्या ‎हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे ‎होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.‎ सदस्य शकुंतला शिंत्रे, नंदुरबार ‎शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक ‎गवते, शेतकी संघ संचालक सुरेश ‎शिंत्रे, डॉ. राजेश वसावे, निवासी ‎वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना‎ बागुल उपस्थित होते. या‎ शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मार्फत‎ सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात‎ आल्या. तसेच ई.सी.जी, एक्स-रे,‎सीटीस्कॅन करण्यात आले.‎

सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा‎ नंदुरबार यांच्या माता सुरक्षित तर घर‎ सुरक्षित या कार्यक्रमांतर्गत ३५० पेक्षा‎ जास्त रनाळेसह परिसरातील‎ नागरिकांनी आरोग्याची तपासणी‎ करून कार्यक्रमाचा लाभ घेतला. या‎ वेळी कार्यक्रमात वैद्यकीय‎ अधीक्षक डॉ. विजय पवार, राजेंद्र‎ गिरासे यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...