आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांचे वाटप:पहिल्याच दिवशी 35 हजार विद्यार्थ्यांना मिळतील पुस्तके; शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी सी.के. पाटील यांची माहिती

शिंदखेडा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. विद्यार्थी बुधवारी शाळेत येतील. शाळेच्या पहिल्याच दिवशी ३५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीची सर्व पुस्तके त्या-त्या शाळेला देण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. जी. पाटील यांनी दिली.

शिंदखेडा तालुक्यात शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित प्राथमिक आणि माध्यमिक ३३० शाळा आहेत. त्यापैकी पहिली ते आठवीच्या १७४ शाळा आहेत. त्यातील १६८ शाळा जिल्हा परिषदेच्या आणि ६ शाळा नगरपालिकेच्या आहेत. या शाळेतील पहिली ते आठवीच्या १३ हजार ५८ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळेल. त्यात ७ हजार ६७ मुलींचा समावेश आहे. तसेच अनुसूचित जातीच्या ५३७, अनुसूचित जमातीच्या ३ हजार ७८३ आणि दारिद्र्यरेषेखालील १ हजार ६७१ मुलांना गणवेश मिळेल. तसेच मोफत पुस्तक वाटप होणार आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास आणि आरोग्य हे विषय असतील. या एका पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहे.

गुलाबपुष्पाने होणार स्वागत
शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी गुलाबपुष्प देऊन किंवा वाजंत्री वाजवून स्वागत होणार आहे. त्यासाठी १९ मार्चला शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा घेण्यात आला होता. या दिवशी पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यांची ओळख करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...