आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाला उजाळा:चातुर्य-साहसाच्या इतिहासाला ३५६ वर्षे; आग्रा ते राजगड शिवज्योत यात्रेचे स्वागत

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चातुर्य-साहस अन् जाज्वल्य इतिहास जागवत आग्रा ते राजगड निघालेली शिवज्योत मशाल यात्रा बुधवारी धुळे शहरात दाखल झाली. ३५६ वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या या यात्रेचे सकल मराठा समाज व शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेत सुमारे ३०० शिवप्रेमी सहभागी झाले आहे. नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ सैन्याचे प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १३वे वंशज अॅड. मारुती आबा गोळे करत आहे. यात्रेचे मध्य प्रदेश ते मालेगाव नियोजन प्रितेश ठाकूर करत आहेत. केशरानंद गार्डन येथे शिवज्योत यात्रेचे आमगन झाले. यावेळी माजी आमदार तथा धुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे, अतुल सोनवणे, रणजित भोसले, सुधाकर बेंद्रे, गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. छत्रपती राजघराण्याचे वंशज म्हणून राजवर्धन कदमबांडे यांना अॅड.मारोतीराव गोळे यांनी त्यांचे वंशज सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे व दिग्विजय जेथे यांनी त्यांचे वंशज सरखेल कान्होजी जेथे यांची प्रतिकृती शिल्प भेट दिली.

या वेळी साहेबराव देसाई, प्रा.बी.ए.पाटील, डॉ. संजय पाटील, संजय बोरसे, धीरज पाटील, राजेश पवार, रावसाहेब मंडाले, लहू पाटील, संदीप पाटोळे, विजय देवकर, विकास बाबर, श्रीरंग जाधव, राजेंद्र इंगळे, उल्हास यादव, ज्ञानेश्वर पाटील, वीरेंद्र मोरे, अर्जुन पाटील, अॅड.नितीन पाटील, विनोद जगताप, जगन ताकटे, बाजीराव खैरनार, हनुमान अवताडे, विक्रम काळे, पवन शिंदे, संदीप शिंदे, वामन मोहिते, प्रफुल्ल माने, आबासाहेब नेतकर, रवींद्र शिंदे, दीपक रौंदळ, हेमंत बागुल, कैलास मराठे, देविदास पवार, दिनेश चव्हाण, अमोल मराठे, हेमंत भडक, अमर फरताडे, हेमंत मराठे, प्रवीण मराठे, भटू चौधरी, विराज रावळे, अतुल साळुंखे, डॉ. अनिल बोरसे, नितीन साळुंखे, गोकुळ देवरे, वसंत वाघ, मनोज घोडके, प्रशांत बोरसे, पंकज चौधरी, नकुल अहिराव, सुमीत शिंदे, ज्योती खैरनार, मीना भोसले, देविदास नवसारे, एम.आर. कोळी, गिरधर महाले, योगेश रोकडे, दिलीप शिरसाठ, देवेंद्र मराठे, चंदू खैरनार यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन निंबा मराठे तर आभार प्रदीप जाधव यांनी मानले.

स्मारक समितीकडूनही करण्यात आला सत्कार
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जी स्मारक समिती व शिवराणा समितीच्या वतीने यात्रेचे स्वागत व सत्कार करण्यात आला. अजित राजपूत, तेजपाल गिरासे, जगदीश राणा, संदीप राजपूत, मनजीत सिसोदिया, अॅड. शैलेश राजपूत, शुभम दुसाने, प्रणील महाजन, विक्की गिरासे, पीयूष अहिरे, अमर गिरासे, यश बच्छाव, कुणाल रवंदळे, नीलेश मेहेंदळे, हर्षल बोरसे, प्रतीक पवार, अमित अडसुरे, तुषार बोरसे, तुषार भदाणे, प्रजय साळुंखे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...