आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील सरवड येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. बुधवारी पहाटे ४ वाजता हा प्रकार उघड होताच ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. या चारही घरफोड्यांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह अंदाजे १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सोनगीर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरवड येथे मंगळवारीच्या मध्यरात्री चार ठिकाणी घरफोडी करून दागीने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला आहे. सरवड येथील कुटुंबीय मंगळवारी रात्री गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मागच्या दाराने घरात प्रवेश केला. यात रमेश नारायण पाटील यांच्या कडील रोख रक्कम ५३ हजार २०० रुपये, सुनील नारायण पाटील यांच्या कडील २५ हजार रोख, रावसाहेब गिरधर पाटील यांच्याकडील रोख रक्कम ६ हजार रुपये, अनिल भटू गवळे यांच्या कडील सोने चांदीचे दागिण्यांसह २५ हजार असा एकूण १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील तसेच उपनिरीक्षक रवींद्र महाले यांच्यासह पोलिस पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एकाच रात्री झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून या घरफोडीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी प्रकरणी सोनगीर पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.