आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्ष:4 तास खुनाच्या कटातील साक्षीदाराची चालली साक्ष

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील रावसाहेब-वैभव पाटील या पिता-पुत्राच्या खून प्रकरणातील नववा साक्षीदार विजय शुक्ला यांची गुरुवारी साक्ष झाली. सुमारे चार तास ही साक्ष सुरू होती. या वेळी शुक्ला यांनी न्यायालयात हजर असलेल्या संशयितांना ओळखले. खटल्याचे पुढील कामकाज २१ व २२ नोव्हेंबरला होणार आहे. गोंदूररोड परिसरात रावसाहेब व वैभव पाटील या पिता-पुत्रावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. ही घटना ८ जून २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी न्या. सय्यद यांच्या समक्ष कामकाज सुरू आहे.

या प्रकरणातील नववा साक्षीदार विजय शंभुनाथ शुक्ला यांची गुरुवारी साक्ष झाली. रावसाहेब व वैभव यांच्या खुनाचा कट रचल्याचे शुक्ला साक्षीदार आहे. तशी माहितीही त्यांनी या वेळी न्यायालयात दिली. तसेच खुनातील संशयित न्यायालयात हजर आहे, असे सांगत विजय शुक्ल यांनी संशयितांना ओळखले. सरकार पक्षाच्या वतीने देवेंद्र तंवर यांनी कामकाज पाहिले. खटल्याचे पुढील कामकाज २१ व २२ नोव्हेंबर रोजी आहे.

बातम्या आणखी आहेत...