आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डल्ला:वकिलाच्या घरातील 4 लाख,दागिन्यांवर डल्ला

धुळे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका वकिलाच्या घरातून चोरट्यांनी ४ लाख रुपये रोख व सोने, चांदीचे दागिने लांबवले. आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

शहरातील बाबानगरातील उस्मानिया मशिदीजवळ अॅड. ताजीम खान करीम खान पठाण राहतात. ते पुतणीच्या साखर पुड्यासाठी बाहेर गेले आहे. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात हातसफाई केली. चोरीचा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याविषयीची माहिती अॅड. पठाण यांना दिली. त्यानंतर अॅड.पठाण आले. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आता प्रवेश केला.

तसेच कपाटातील ४ लाख रुपये रोख, सोन्याच्या २ तोळ्याच्या साखळ्या, १५ भार चांदी असा मुद्देमाल लांबवला. घटनेनंतर आझादनगर पाेलिसांनी भेट दिली. सहायक पोलिस वाय. पी. राजपूत, पोलिस उपनिरीक्षक एच. व्ही. हरणे, पोलिस कॉन्स्टेबल राजू मिस्तरी, हेडकॉन्स्टेबल धनंजय मोरे, कॉन्स्टेबल एम.एस. ब्राह्मणे, प्रशांत माळे यांनी पाहणी केली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...