आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:आवास योजनेतून 4 वर्षांत 400 घरकुल‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेतून‎ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी‎ घरकुल योजना राबवली जाते. या‎ योजनेतून महापालिका हद्दीत‎ गेल्या चार वर्षांत ४०० घरकुल‎ बांधण्यात आली. योजनेची‎ अंमलबजावणी संथगतीने सुरू‎ असल्याची स्थिती आहे. या‎ पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास‎ योजनेच्या संचालकांनी‎ महापालिका यंत्रणेला योजनेची‎ गती वाढवण्याची सूचना केली‎ आहे.

त्यानंतर आता महापालिकेचे‎ कर्मचारी थेट लाभार्थींच्या घरी‎ जात बांधकाम परवानगीसह अन्य‎ कागदपत्र जमा करत आहे.‎ पंतप्रधान आवास योजनेंतर्गत‎ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील‎ लाभार्थींना घर बांधण्यासाठी २‎ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले‎ जाते. या योजनेचा लाभ‎ घेण्यासाठी सुमारे ६ हजार अर्ज‎ महापालिकेकडे आले होते.‎ अर्जांची छाननी करून प्रस्ताव‎ शासनाला पाठवण्यात आले.‎ मनपा प्रशासनाने टप्प्या टप्प्यात १‎ हजार ८०३ लाभार्थींना घर मंजूर‎ केले. त्यासाठी सुमारे १३ कोटींचे‎ अनुदान प्राप्त झाले. शहरात सन‎ २०१८ ते २०२२ या चार वर्षांत‎ केवळ ४०० लाभार्थींनी घरांचे‎ बांधकाम केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...