आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग:जामिया अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेत ४०० विद्यार्थी सहभागी

अक्कलकुवा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जामिया अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्ताने अक्कलकुवा येथे पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत आसपासच्या महाविद्यालयातील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील मॅरेथॉनचा मार्ग महाविद्यालयापासून मोलगी रस्त्यावरील गंगापूर गावापर्यंत होता, स्पर्धेत रवींद्र वसावे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक, जयसिंह वसावे याने द्वितीय तर दशरथ वसावे याने तृतीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांना जामिया इस्लामिया इशाउतुल संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहंमद वस्तानवी, मुख्य कार्यकारी अधिकारी मौलाना हुजैफा वस्तानवी, संस्थेचे प्रतिनिधी शेख अखलाख अहमद यांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी संस्थेचे कार्यवाहक मौलाना ओवेस वस्तानवी यांनी विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगितले. या वेळी प्राचार्य डॉ. सय्यद कमालुद्दीन, उपप्राचार्य मोहम्मद शाकीर यांचे ही मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. जुनेद शेख, क्रीडाशिक्षक प्रा. जुनेद काजी आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...