आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. परीक्षेत येथील मुक्तांगण शाळेतील ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. मुक्तांगण विद्यालयातील ७२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आणि ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.
शाळेतील कल्पेश देवरेने ग्रामीण विभागात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. तसेच मयूर मराठे, यशोदीप पाटील, पृथ्वीराज सोळुंके, प्रणव पाटील, वैष्णवी पतील, जयेश माळी, कृष्णा कथाडे, कृष्णाई भदाणे, वाल्मीक पाटील, साई पाटील, स्वप्नील देवरे, मंजुषा पाटील, चेतन पाटील, यश जाट, वैभव खैरनार, वैभव किरण, यश मोरे, यश भारत, तनिष्का वाघ, साईदास राजपूत, कृतिका पाटील, कुणाल वाघ, रोहित पगारे यांनी, नेहा गंगाधर वाघ, साक्षी भाऊसाहेब पवार, रोशन ईश्वर देवरे, सिद्धी विजयकुमार मराठे, शिवम समाधान देवरे, हर्षल प्रकाश वाघ, पुष्पक देविदास मराठे, मानसी महेंद सोंजे, प्रसाद दीपक पांचबाई, गुरवेश तुषार जोशी, दीपांजली जितेंद्र देवरे, भावेश मनोज सावंत, नंदिनी देविदास माळी, यश संजय पाटील, मोहनिश संजय अहिरे, भूषण उमेडसिंग राजपुत, निखिल किशोर माळी, मयुर दीपक पाटील, अक्षय ईश्वर चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यार्थ्यांना मुख्यध्यापक बेहरे, श्वेता सोवे, राकेश पाटील, विजय पाटील, तूबा शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.