आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:ट्रकमधून 49 लाखांचे टीव्ही; लॅपटॉप लंपास

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे मार्गे भिवंडी वरून कोलकाताच्या दिशेने निघालेल्या ट्रकमधून चोरटयांनी सुमारे ४९ लाखांचे टिव्ही, लॅपटॉप तसेच इतर साहित्य लांबवले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका संशयितास पारोळावरुन अटक केली.

कनिफनाथ रोललाईन्सचा ट्रक ( एमएच १४, जेएल ८२९९) हा कोलकाताला निघाला होता. त्यामध्ये ब्लू डार्क या कुरीयर कंपनीचा माल होता. चालकाने तीन जणांना प्रवाशी म्हणून बसवले होते. अजंग शिवारातून जात असताना मध्यरात्री चालकाने वाहन थांबवून झोपण्याचा निर्णय घेतला. या वेळी ट्रकचे इलेक्ट्रानिक लॉक तोडून चोरटयांनी एससीडी, लॅपटॉप व इतर साहित्य लांबवले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल रामराव सरदार ( वय ३५, रा. हनुमान खेडे, ता. अचलापूर, अमरावती ) याला पारोळा येथून अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...