आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातबारा उतारे संगणकीकरण:सातबारा उतारे अद्ययावत करण्यात शिरपूर राज्यात चौथा; विभागात तिसरा

शिरपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात शासनाने सन २००२ पासून सातबारा उतारा संगणकीकरणास सुरुवात केली आहे. पण खऱ्या अर्थाने सन २०१५ पासून सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण होण्यास वेगात सुरुवात झाली. सातबारा उताऱ्याविषयी शिरपूरच्या तहसीलदारांसह तलाठींनी परिश्रम घेऊन सर्व अहवाल निरंक करून स्वयंघोषणापत्र सादर केले. त्यामुळे शिरपूर तालुक्याने राज्यात सातबारा उतारे संगणकीकरण करण्याच्या कामात चौथा तर नाशिक विभागात तिसरा क्रमांक पटकावला.

सातबारा उतारा संगणकीकरणास सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. या अडचणींवर मात करून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आदींनी उताऱ्यांचे संगणकीकरण केले. तलाठी, नायब तहसीलदार व तहसीलदारस्तरावर स्वयंघोषणापत्र जाहीर करण्यात आले. शेवटच्या टप्यात उपविभागीय अधिकारीस्तरावर स्वयंघोषणापत्र देताना ऑनलाइन डेटामधील १ ते ४३ अहवालातील सर्व त्रुटींची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील सर्व अहवाल निरंक झाले. स्वयंघोषणापत्र क्रमांक ४ सादर केल्यामुळे संपूर्ण राज्यात शिरपूर तालुक्याने सातबारा उतारे संगणकीकरण करण्यात चौथा आहे.

बातम्या आणखी आहेत...