आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश फेरी:291 जागा भरण्यासाठी आयटीआयमध्ये चाैथी फेरी

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय आयटीआयमधील रिक्त जागा भरण्यासाठी तीन प्रवेश फेऱ्या झाल्या. उर्वरित जागा भरण्यासाठी उद्या बुधवारपासून चौथी प्रवेश फेरी सुरू होणार आहे. अद्यापही २९१ जागा अद्याप रिक्त आहेत.

आयटीआय प्रवेशप्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली आहे. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी उद्या बुधवारपासून चौथी फेरी होणार आहे. त्यासाठी मंगळवारी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रिक्त जागा जाहीर झाल्या. चौथ्या फेरीअंतर्गत २७ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशासाठी ३० आणि ३१ ऑगस्टला समुपदेशन फेरी होईल. तसेच २ ते ५ सप्टेंबरपर्यंत जागा वाटप आणि प्रवेश होणार आहे. दरम्यान शहरातील शासकीय आयटीआयमध्ये तीन फेऱ्यांमध्ये ७६९ जागा भरल्या गेल्या. अद्याप २९१ जागा रिक्त आहे. त्यात विविध ट्रेडच्या जागांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...