आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:नेर-कावठी रस्त्यासाठी‎ 5  कोटी 62  लाख मंजूर‎

नेर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील नेर ते कावठी‎ रस्त्यासाठी ५ कोटी ६२ लाखांचा‎ निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याची‎ दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे‎ रस्त्याचे काम करावे, अशी मागणी‎ नेर, शिरधाणे, अकलाड, मोराणे,‎ कावठी येथील शेतकऱ्यांनी केली‎ होती. हे काम व्हावे यासाठी नेर‎ जिल्हा परिषद गटातील भाजप‎ पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. सुभाष‎ भामरे यांच्याकडे पाठपुरावा केला.‎

त्यानुसार पंतप्रधान ग्राम सडक‎ योजनेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर‎ झाला.‎ रस्त्याचे काम व्हावे यासाठी‎ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या‎ मनीषा खलाणे, माजी सरपंच‎ शंकरराव खलाणे, गुलाबराव बोरसे,‎ संजय कपूर, डॉ. सतीश बोढरे,‎ वसंत देशमुख, वसंत सोनवणे,‎ सुरेश सोनवणे, आर. डी. माळी,‎ संतोष ईशी, डॉ. दिनेश नेरकर,‎ दीपक मोरे, संजय सैंदाणे, गोटू‎ अमृतसागर, दिनेश सोनवणे, शंकर‎ कोळी, रावसाहेब खलाणे, दीपक‎ खलाणे, उमेश जयस्वाल, सौरभ‎ विभांडिक, तुषार जयस्वाल, पवन‎ कोळी आदींनी पाठपुरावा केला.‎

बातम्या आणखी आहेत...