आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती रखडली:आरोग्यवर्धिनी केंद्रात 5 डॉक्टर नियुक्त

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात सुरू झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रात पाच एमबीबीएस डॉक्टर नियुक्त झाले आहे. तसेच आखणी दहा डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात १६ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रात काम करण्यासाठी एमबीबीएस डाॅक्टर इच्छुक नसल्याने डॉक्टरांची नियुक्ती रखडली होती. या केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नेमण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे.

त्यानुसार दर सोमवारी एमबीबीएस डॉक्टरांच्या मुलाखती होत आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ५ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उद्या सोमवारी पुन्हा काही डॉक्टरांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी पाच डॉक्टर मिळाल्याने आरोग्य सुविधा बळकट होण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...