आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघटनेनंतर तात्काळ मदत आणि गुन्हेगारीवर वचकसाठी शहरातील एक दोन नव्हे सुमारे ५ हजार पेक्षा अधिक खासगी सीसीटीव्ही पोलिसांच्या नियंत्रणात आणता येणार आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही प्रक्रिया भविष्यात राबवली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक सीसीटीव्ही असलेल्या घर, व्यापारी संकुलातील नागरिकांना ही परवानगी विनंती अर्ज देऊन घ्यावी लागणार आहे. सुरक्षा व गुन्हेगारी रोखण्यासाठी ही बाब सध्या पोलिसांच्याही विचाराधीन आहे. शहरातील गुन्हेगारीवर आता हायडेफिनेशनच्या ४९६ कॅमेराचा वॉच राहणार आहे.
शहरातील ११६ ठिकाणी हे सीसीटीव्ही लावले आहे. तर शहरातील उच्चभ्रू वसाहती, कॉलनी, औद्याेगिक क्षेत्र, व्यापारी संकुल, शाळा-महाविद्यालये एवढेच काय तर इतर ठिकाणी असलेले खासगी सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलिस लक्ष ठेवणार आहे. यातून शहरातील सुमारे ५ हजार सीसीटीव्ही पोलिसांच्या नजरेखाली राहतील. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेतून ती जोडली जाणार आहे. अर्थातच शासकीय व खासगी कंपनीने विस्तारलेल्या फायबर ऑप्टीकल केबल द्वारे हे सीसीटीव्ही नियंत्रणात असतात. तिचा संबंध थेट पोलिस नियंत्रण कक्षात असेल. यामुळे विशिष्ट ठिकाणी गैरप्रकार घडल्यानंतर नेमके काय झाले होते.
त्यांची अचूक वेळ तसेच वास्तव चित्रण पोलिसांना पाहता येईल. ४९६ चे लोकार्पण शहरातील विविध ११६ ठिकाणी असलेल्या ४९६ सीसीटीव्हीचे त्रिनेत्र नियंत्रण कक्षातून पोलिसांची नजर राहील. त्याचे रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. अमरीश पटेल, जयकुमार रावल, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी उपस्थित होते.
खर्चीक पण विचाराधीन
सुरक्षा अन् गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी अनेक बाबी विचाराधीन आहे. एआयच्या माध्यमातूनही प्रयत्न संभाव्य आहे. शासनाचे प्रयत्न त्यात मोलाचे आहे. त्यासाठी निधीही लागेल. सध्या व्यापाऱ्यांना रस्त्याच्या दिशेने सीसीटीव्हीलावण ्याचे आवाहन केले आहे. शिवाय गुन्हेगारांवर वॉच ठेवणारे अॅप्सची चाचणी सुरू आहे. जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातही सीसीटीव्ही बसवण्याचे विचारात आहे. -डॉ. बी. जी. शेखर-पाटील, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक
अशी असेल प्रक्रिया
यंत्रणा बसवण्यासाठी संबंधित मालकालापोलिसां ची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी विनंती अर्ज सादर केल्यावर आवश्यक प्रक्रियेनंतर संबंधित खासगी सीसीटीव्ही पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडला जाईल.
प्रथमच लौकिक कायम
एआय यंत्रणेने सीसीटिव्हीवर वॉच ठेवणारा धुळे प्रथम जिल्हा राहणार आहे. साद्यस्थितीत ही यंत्रणा अयोध्यामधील मंदीर व संवेदनशील ठिकाणी कार्यरत झाली आहे. तर ४१६ सीसीटीव्हीने वॉच राखण्यातही जिल्हा प्रथम ठरला आहे. थोडक्यात दुहेरी बाजुने प्रथम लौकीक कायम राहिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.