आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपणाचे उद्दिष्ट:पालिकेत आज ५ हजार वृक्ष होणार उपलब्ध; आजपर्यंत ८०० रोपे वाटप

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे नागरिकांना वृक्षांचे वाटप करण्यात येत आहे. शहरात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करण्यात येत आहे. महापालिकेला शासनाकडूनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात येते. त्याप्रमाणे महापालिकेने वनविभागाकडून आता पाच हजार रोपे मिळवली आहे. ती शुक्रवारपर्यंत महापालिकेला प्राप्त होणार आहे. तर पूर्वी हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यात ८०० पेक्षा अधिक रोपांचे वाटप झाले आहे.

महापालिकेला शासनातर्फे शहरात १ लाखांवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याप्रमाणे महापालिका प्रशासनातर्फे वृक्षलागवडीसाठी नियोजन करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेला वनविभागाकडून रोपांची खरेदी करावी लागणार आहे. त्याप्रमाणे हजार रोपांची खरेदी करण्यात आली आहे. तर उर्वरित रोपे उपलब्ध नसल्याने महापालिकेला ती इतरत्र खरेदी करावी लागणार आहे. महापालिका प्रशासन निविदा काढून मान्यताप्राप्त नर्सरीकडून ते घेणार आहे. मात्र रोपांचा शोध घेत असताना महापालिकेला तळोदा येथून मोफत रोपे उपलब्ध झाली आहे. पाच हजार रोपे उपलब्ध झाली आहे. त्याची वाहतूक करून ते शुक्रवारपर्यंत महापालिकेत उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना शहरात रोपांची उपलब्धता राहणार आहे. नूतन महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्याठिकाणी रोपांचे वाटप नागरिकांना नोंद करून देण्यात येत आहे. पूर्वी हजार रोपे आणली होती. ती आता शेवटच्या टप्प्यात आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरात वृक्षलागवड चांगल्या प्रकारे होणार आहे. याअगोदर लावण्यात आलेल्या अनेक ठिकाणी वृक्ष जगल्याने परिसरात हिरवळ निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...