आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविष्कार:विज्ञान प्रदर्शनात 50 विद्यार्थ्यांचे थक्क करणारे कलाविष्कार सादर

दोंडाईचा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आरडीएमपी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात लहान गटातून १५ व मोठ्या गटातून ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

प्राचार्य एस.के. चंदने यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शिरपूर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आर.ए. चित्ते, उपमुख्याध्यापिका एस.एन. पाटील, पर्यवेक्षक भारत सिसोदिया आदी उपस्थित होते. प्रा. बी.जी. शिंदे, प्रा. एस.एम. रामोळे, आर.ए. पवार, एस.आर. तावडे यांनी परीक्षण केले. सहावी ते आठवीच्या गटात प्रथम क्रमांक चेतना दीपक तिरमली, द्वितीय क्रमांक गोपाल लक्ष्मण तिसे, तृतीय क्रमांक आश्विन राजाराम तिरमली, हर्षल सुनील तिरमली, उत्तेजनार्थ क्रमांक दुर्गेश भिला तिरमली, सुधीर राजाराम तिरमले यांनी मिळवला. नववी ते बारावीच्या गटात प्रथम क्रमांक विश्वजीत नरेंद्र सिंग पाटील, दिग्विजय देवेंद्र राजपूत, प्रणव सुतार, द्वितीय क्रमांक अनिल देहला पावरा, आश्विन जाण्या वळवी, तृतीय क्रमांक वेदमयी सोनवणे, अनुष्का सुरेश सिंग गिरासे व प्रतिभा बडगुजर, तृतीय क्रमांक सोनू मीना जैन, देवयानी नवलसिंग जाधव , उत्तेजनार्थ , जयेश राकेश तिरमली, धीरज युवराज तिरमली व चेतन झुलाल पाटील यांनी मिळवला.

बातम्या आणखी आहेत...