आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:घोडेबाजारामुळे 50 महिलांना मिळाला रोजगार

सारंगखेडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे ७ डिसेंबरपासून सारंगखेडा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सारंगखेडा यात्रेमुळे परिसरातील व स्थानिक सामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यात ५० वर महिलांनाही चारा आणि पाणीच्या माध्यमातून चांगल्या रोजगारीची संधी मिळाली आहे. यातूनच ते आपले वार्षिक नियोजन करीत आहेत.

सारंगखेडा येथील घोडेबाजारात घोड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य लागत असते. त्यात प्रामुख्याने चारा, चना, मका, गव्हाचा भुसा सारखे खाद्य लागत असते. घोड्यांना चारा खाद्य पोषक व महत्त्वाचे असते. घोडेमालक चारा खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. म्हणून परिसरातील व स्थानिक महिला शेताच्या बांदावरील चारा कापून घोडेबाजारात विक्री करायला जात असतात. चाऱ्याच्या मोळी बनवून एक मोळी दोनशे ते तीनशे रुपयाला विक्री करत असतात. एक महिला दिवसातून ४ ते ५ मोळी विक्री करत असते. त्यातून दिवसाला चारा विक्रीतून पंधराशेहून अधिक रुपयाची कमाई होत असते. असे एक महिना चालत असते. चाराच्या माध्यमातून महिलाना महिनाकाठी हजारो रुपयाचे आर्थिक पाठबळ मिळत आहे.

देशातील पर्यटकांसाठी उभारली जातेय टेंट सिटी चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांसोबत अश्वमालक देखील येत असतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था तापी नदीच्या किनारी व निसर्गरम्य व नयनरम्य वातावरणात टेंट सिटी मध्ये केली आहे.

व्यवसाय, अन्य माध्यमातून तरुणांनाही मिळतो रोजगार यात्रेत पाळणे सांभाळण्यासाठी अनेक तरुणांना कामावर लावले आहे. त्यांना १० ते १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. सारंगखेडासह कळंबू, अनरद, पुसनद, कुकावल, कोठली, वडाळी, तोरखेडा तसेच टेंभे त.सा, देऊर, कमखेडा, बामखेडा, टाकरखेडा सारख्या गावातील नागरिक, तरुणांनी आपले व्यवसाय थाटले आहेत.

बातम्या आणखी आहेत...