आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आविष्कार:तळोदा येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 52 संशोधनात्मक उपकरणे

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व पी. ई. सोसायटी संचलित शेठ के. डी. हायस्कूल यांच्या विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची ५२ उपकरणे मांडण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे होते.

कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष पी. ई. सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य सुहास नाईक, उपसभापती लता वळवी, जि.प. सदस्या सुनीता पवार, पं.स. सदस्य सुमन वळवी, शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, नगरसेवक संजय माळी, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, मुरलीधर सागर, बच्चूसिंग परदेशी, दत्तात्रय माळी, हिरालाल मगरे यांच्यासह मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी, अजित टवाळे, भास्कर मराठे, सी. एम. पाटील, एन. व्ही. मराठे, सुनील परदेशी, जे. एल. सूर्यवंशी, हेमलाल मगरे, नीलेश सूर्यवंशी, पिंजारी उपस्थिती होते. प्रस्तावना गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी केली. विज्ञान प्रदर्शनांचे स्वरूप व सखोल माहिती मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी यांनी दिली. सूत्रसंचालन पी. एम. वानखेडे, एस. आय. जोहरी यांनी केले. आभार मुख्याध्यापक सुनील परदेशी यांनी मानले. शेठ के डी हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अशी आहे गटनिहाय उपकरणांची मांडणी
उच्च प्राथमिक गट खुला १२, उच्च प्राथमिक गट राखीव ११, माध्यमिक गट खुला १३, माध्यमिक गट राखीव १०, प्राथमिक शिक्षक ५, माध्यमिक शिक्षक १, एकूण ५२ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. परीक्षण वरिष्ठ महाविद्यालयीन प्रा. ए. डी. धोंडगे, प्रा. डॉ. एम. एच. माळी, प्रा. वाणी यांनी केले.

स्वच्छ विद्यालय पुरस्काराने गौरव... जि.प. प्राथमिक शाळा बुधावल यांना फाइव्ह स्टार, नेमसुशील प्राथमिक विद्यामंदिर फोर स्टार, नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल फोर स्टार, अनंत ज्ञानदीप आश्रमशाळा कोठार फोर स्टार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...