आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉलिबाॅल स्पर्धा:व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये ५४ संघांचा सहभाग

शिरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे अँबिशन क्रीडा स्पर्धेंतर्गत व्हॉलिबाॅल स्पर्धा झाली. स्पर्धेत मुलांच्या गटातून ३० तर मुलींच्या गटातून २४ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, क्रीडाविभाग प्रमुख प्रितेश पटेल, प्राचार्य पी.व्ही. पाटील, प्राचार्य आर.बी. पाटील, मुख्याध्यापक सी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत मुलांमध्ये १४ वर्षाच्या आतील गटातून आर. सी. पटेल मेन बिल्डिंग संघ शिरपूर, १७ वर्षांच्या आतील गटातून मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल तांडे, १९ वर्षांच्या आतील गटातून आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज शिरपूर यांनी विजेतेपद मिळवले.

१४ वर्षांच्या आतील गटातून आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय भोरखेडा, १७ वर्षांच्या आतील गटातून आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे, १९ वर्षांच्या आतील गटातून मुकेश पटेल मिलिटरी स्कूल तांडे यांनी उपविजेतेपद मिळवले. मुलींमध्ये १४ वर्षांच्या आतील गटातून मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल तांडे, १७ वर्षांच्या आतील गटातून एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर, १९ वर्षांच्या आतील गटातून मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल तांडे यांनी विजेतेपद मिळवले. १४ वर्षांच्या आतील गटातून आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर, १७ वर्षांच्या आतील गटातून मुकेश आर.पटेल सीबीएसई स्कूल तांडे, १९ वर्षांत एच.आर. पटेल कन्या विद्यालय शिरपूर यांनी उपविजेतेपद मिळवले.

बातम्या आणखी आहेत...