आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:592 बोगस अपंग विशेष शिक्षकांचे समायोजन ; आरपीआय मराठा आघाडीचा पत्रकार परिषदेत आरोप

धुळे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजना व अपंग समावेशित शिक्षण योजनेतील खऱ्या विशेष शिक्षकांसाठी आरपीआय मराठा आघाडीच्या माध्यमातून पारदर्शकपणे लढा सुरु आहे. या लढ्यातून खऱ्या विशेष शिक्षकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पहिली सकारात्म्क घटना घडली. सहा बोगस शिक्षक आणि त्यांच्या मोरक्यावर गुन्हा दाखल झाला. आरपीआय मराठा आघाडीचा सतत पाच वर्षाचा पाठपुरावा संघर्षामुळे हे शक्य झाले. ५९२ बोगस अपंग विशेष शिक्षकांच्या भरतीत राज्यातील आजी, माजी मंत्र्याचा देखील समावेश असल्याचा आरोप करत, गुन्हेगारांना शासन होण्यासाठी संघर्ष सुरु ठेवण्यात येईल, अशी माहिती आरपीआय मराठा आघाडीचे केंद्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहर पोलीस ठाण्यात अपंग युनिट मधील सहा बोगस शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.या संदर्भात माहिती देण्यासाठी आरपीआय मराठा आघाडीच्या पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे, शोभाताई चव्हाण,कुंदन खरात उपस्थित होते.यावेळी साळुंखे यांनी सांगीतले की, शासनाची दिशाभुल करत खोट्या कागदपत्रांच्या आधारे खऱ्या विशेष शिक्षकांच्या हक्कावर बोगस विशेष शिक्षकांनी ताव मारण्याचा प्रकार सुरु होता.