आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कारमधून 6  लाखांचे अफूचे बोंड जप्त

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील मोघण गावाच्या शिवारात कारमधून पोलिसांनी ६ लाखांचे अफूची बोंड जप्त केले. अज्ञात वाहन चालकाने वाहन सोडून पळ काढला.आर्वी-शिरुड रस्त्यावरील मोघण गावाच्या शिवारात पाटचारीजवळ एक कार (एमएच-१२-यूएफ-८५६०) बेवारस उभी होती.

पोलिसांनी या कारची झडती घेतल्यावर त्यात अफूची बोंड मिळून आली. त्यांची किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे. याशिवाय १० लाखांची कार जप्त करण्यात आली. घटनेबद्दल शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...