आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामांसाठी निधी:साक्री तालुक्यातील 17 कामांसाठी 61 कोटी 74 लाखांची बजेट तरतूद, आमदार मंजुळा गावित यांची माहिती

धुळे/साक्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहतूक सुरळीत होण्यास मदत

साक्री तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विविध खात्यांतर्गत ६१ कोटी ७४ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. पूल, रस्ते, जलनिस्सारणाच्या १७ कामांसाठी हा निधी मंजूर झाला.

साक्री तालुक्यातील रस्ते, पूल, मोऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आमदार मंजुळा गावित यांनी बैठक घेतली. तसेच विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील ५ रस्त्यांसाठी २४ कोटी, बिगर आदिवासी क्षेत्रातील पिंपळनेर परिसरातील १० व साक्री परिसरातील ५ रस्त्यांसाठी ३७ कोटी ५ लाख अशी एकूण ६१ कोटी ७४ लाखांची तरतूद करण्यात आली. निधी मंजूर व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. देशशिरवाडे दिघावे, बेहेड, म्हसदी, देऊर रस्त्यासाठी २ कोटी, प्रकाशा, छडवेल, शनिमांडळ, रामा रस्त्यासाठी २ कोटी ५ लाख, नंदुरबार, साक्री, मनमाड रस्त्यासाठी ३ कोटी, टिटाणे ते पेटले रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, कोकले, नांदवण रस्त्यासाठी २ कोटी ८५ लाख, कासारा दारखेल रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, कोरडे ते इसरडे -पेटले रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, गणेशपूर, सायने रस्त्यासाठी ९५ लाख, छडवेल ते आमखेल रस्त्यासाठी २ कोटी, मुंगबारी ते दहिवेल रस्त्यासाठी २ कोटी, नवापूर, पिंपळनेर रस्त्यासाठी ४ कोटी, नांदर्खी, कडूपाडा, खोकसे रस्त्यावरील लहान पुलाच्या कामासाठी ३ कोटी, रोहोड, कुहेर, शिंदपाडा रस्त्यासाठी २ कोटी ३७ लाख, कुडाशी, टेकपाडा, देवळीपाडा रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, छडवेल, रांजणीपाडा, विटावे रस्त्यासाठी १ कोटी ४२ लाख, नवापाडा, पिंजारझाडी रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख, ब्राह्मणवेल, नवापाडा रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले.

बातम्या आणखी आहेत...