आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी:34 ग्रामपंचायतींच्या 54 जागांसाठी 63 अर्ज दाखल; उद्या होणार छाननी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुसार १३ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या मुदतीत ३४ ग्रामपंचायतींच्या ५४ जागांसाठी केवळ ६३ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यातील काही जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता गोहे. तसेच २५ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. त्यात सर्वाधिक साक्री तालुक्यातील १२ जागांचा समावेश गोहे. निधन, राजीनामा, गोरक्षण गोदी विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या रिक्त जागा भरण्यासाठी ५ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुसार १३ ते २० मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल झाले. या मुदतीत ४८ जागांसाठी ६३ अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी सर्वाधिक ५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. धुळे तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या १५ जागांसाठी १९, साक्री तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या १५ जागांसाठी ६, शिरपूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या १२ जागांसाठी ९, शिंदखेडा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींच्या १२ जागांसाठी २९ अर्ज दाखल झाले आहे. धुळे तालुक्यातील ४, साक्री तालुक्यातील १२, शिरपूर तालुक्यातील ८ व शिंदखेडा तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...