आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उत्कृष्ट खेळाडू म्हणून 7 वर्षीय मानस शिंदे याची स्पर्धेतून निवड; बॅडमिंटनमध्ये अपूर्वला तिहेरी, ऋतूला दुहेरी मुकुट

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य बॅडमिंटन असोसिएशन, शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अपूर्व सुभेदारला तिहेरी तर ऋतू भावसारला दुहेरी मुकुट मिळाला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ७ वर्षीय मानस शिंदे याची निवड करण्यात आली.

जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार, डॉ. सलील पाटील, डॉ. अजय सुभेदार, डॉ. मिलिंद वडाळकर, नंदकुमार बेडसे आदी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेतून सिनिअर गटातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेचा निकाल असा विजेते व उपविजेते या क्रमाने : १० वर्ष वयोगट- मुले : हिमांशू चौधरी, दोंडाईचा, अनय बाविस्कर धुळे. मुली- मनस्वी काळे, धुळे, सुरभी काटे, धुळे. १३ वर्षे वयोगट- मुले : सिद्धेश पवार, धुळे, आयुष पाटील, धुळे. मुली : जान्हवी पाटील, धुळे, उर्वी शिंदे. १५ वर्षे वयोगट- मुले : अपूर्व सुभेदार, प्रणव कोकांदे. मुली : ऋतु भावसार, स्वाती चित्ते. १७ वर्ष वयोगट- मुले : अपूर्व सुभेदार, जिग्नेश सिसोदे, शिरपूर. १९ वर्ष वयोगट- मुले: अपूर्व सुभेदार, पुरुषोत्तम माथणे, शिरपूर. महिला एकेरी- ऋतू भावसार, प्राजक्ता माळी, मिश्र दुहेरी- रूपन चौधरी व प्राजक्ता माळी, शिरपूर. अभिजित पाटील व अनुष्का पाटील, धुळे. प्रौढ दुहेरी- ३५ वर्षांपुढील : जयेश चौगावकर व अभिजित येवले. नरेश मराठे व डॉ. सलील पाटील. प्रौढ दुहेरी- ४५ वर्षांपुढील : डी.व्ही. पाटील व उमेश पटेल, महेश भोई व डाॅ. मिलिंद वडाळकर. स्पर्धेसाठी योगेश पाटील, हर्षल पाटील, उमेश पटेल, गौरव कुमार, गाेपाल पाटील, अभिजित पाटील, अनुष्का पाटील, स्वप्निल मोरे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...