आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची लूट:वर्षभरात 70 दिवस पाणीपुरवठा, पाणीपट्टी वसुली 365 दिवसांची

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाण्याचे गणित रोजचे पाणी पडते 27 रुपयांना, वास्तविक मिळाले पाहिजे 5 रुपये 20 पैशांनाजादा वसुली मनपा प्रशासन धुळेकरांकडून रोज 21 रुपये 95 पैसे जादा रक्कम करते वसूल

धुळे शहरात असमान पाणीपुरठा होत असून शहरवासीयांना वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी फक्त ७० दिवसच पाणीपुरवठा होता, त्यासाठी १९०० रुपये पाणीपट्टी वसूल केले जातात. म्हणजेच धुळेकरांकडून मनपा दररोज २७ रुपये १५ पैसे वसूल करते, वास्तविक ७० दिवसांचा हिशेब केल्यास दररोज फक्त ५ रुपये २० पैसे वसूल केले पाहिजे, मनपा प्रती दिन २१ रुपये ९० पैसे जादा वसूल करत आहे. धुळेकरांवर हा अन्याय आहे. शहरातील प्रत्येक भागात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासनाकडून दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात पाच दिवसानंतरच पाणीपुरवठा शहरात होत आहे.

नवीन जलकुंभांची जोडणी, पाण्याची वेळ कमी करा
शहरात पाणीपुरवठयाची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठयाची वाटच पहावी लागते. याकरीता पाणीपुरवठयाच्या व्यवस्थेत काही बदल केल्यास किमान पाणीपुरवठयाचे दिवस कमी करण्यास मदत होणार आहे. त्याकरीता नवीन जलकुंभाची जलवाहिनीची जोडणी करावी. तसेच लोकसंख्या वाढीप्रमाणे पाणी क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या जलवाहिनी तात्काळ बदलवण्यात यावे. गळतीतून मोठया प्रमाणात पाणी वाया जाते. या उपाय योजना केल्यानंतर पाणीपुरवठयाच्या वेळेत किमान अर्धा तासाची कपात करा. यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टळणार आहे. तर नागरिकांनीही कुठे पाणी वाहत असल्यास ते तात्काळ मनपाला कळवावे. विनाकारण पाण्याचा वापर बंद करा. नागरिकांचेही तोटया बसवून सहकार्य महत्वाचे आहे.

ही आहेत पाणीपुरवठा विलंबाने होण्याची कारणे
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात समाधानकारक पाणीसाठा आहे. परंतु शहरात जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व शहराला पाणीपुरठा करणे शक्य होत नाही. शहराला साधारणपणे दररोज १०० एमएलडी पाण्याची आवश्यकता असतांना ४५ ते ५० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. जलकुंभाची संख्याही कमी असल्याने प्रत्येक भागाला टप्याटप्याने पाणी मिळते. जलकुंभापासून ४ किलोमिटर पेक्षा अधिक अंतरावर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे कालावधी वाढतो. तर जलवाहिन्या ३० ते ४० वर्षापुर्वीच्या असल्याने वारंवार गळती लागत असल्यानेही पाणीपुरवठा लांबतो.

प्रभाकर पाटोळे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकामशहराला दररोज १०० एमएलडी पाण्याची आहे आवश्यकतावर्षाला १९०० पाणीपट्टी वसुली शहरात नागरीकांकडून महापालिका घरपट्टी, पाणीपटटी वसुल करते. महापालिकेचे हे आर्थिक स्त्रोत असुन त्यातुन शहरात विकास कामे करण्यात येतात. मात्र शहरातील नागरीकांना पाणीपुरठाच नियमीत वर्षभर होत नाही. पाणीपट्टी मात्र वर्षाला १९०० रुपये वसुल करण्यात येतात. नागरीकांना सुविधा दिल्यास नागरीक करही आनंदाने देतील. मा़त्र सुविधांचीच वाणवामुळेही नाराजी होते.

बातम्या आणखी आहेत...