आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 लाखांचा ट्रक लंपास:सारंगखेडा येथून 70 लाखांचा ट्रक अज्ञात चोरट्यांकडून लंपास

सारंगखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दोंडाईचा-शहादा मार्गावरील श्री कृष्णा पेट्रोल पंप येथून अज्ञात चोरट्याने ७० लाख रुपये किमतीचा ट्रक (डंपर) लंपास केल्याची घटना उघडकीस आली. वाळू, खडी वाहतूक करणारा १६ चाकी उभा असलेला ट्रक परिसरात कोणीच नसताना चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. या घटनेमुळे डंपर चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी ट्रकचा लवकर शोध घेण्याची मागणी केली जात आहे.

या प्रकरणी रौफ रशीद खाटीक यांनी फिर्याद दिली. ते प्रकाशा येथील रहिवासी असून चोरट्यांनी चोरी करताना ट्रकला लावलेले जीपीएस ट्रॅकर तोडले आहे. ट्रक घेऊन फक्त २ महिने झाले होते. ट्रकचे दरवाजे बंद होते, कुठलाही काच न फोडता व दरवाजे न तोडता ट्रक चोरण्यात आला आहे. त्यांचा ट्रक मालवाहतुकीसाठी शिरपूर, धुळे येथे जात हाेता. त्यामुळे ते येथील श्री कृष्णा पेट्रोल पंप येथे ताे उभा करत. तेथूनच चाेरट्यांनी ताे लांबवला.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. येथून जाणाऱ्या प्रत्येक मार्गावरील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली जात आहे. टाेल प्लाझाशी संपर्क केला.

बातम्या आणखी आहेत...