आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षणे:जिल्ह्यात गोवरसदृश 70 रुग्ण; शहरामध्ये 7 जणांवर उपचार, पालिका उभारणार कक्ष

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागात गोवरचे संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने घेतलेल्या नमुन्यात सध्या जिल्ह्यात ७० गोवरसदृश रुग्ण असून त्यात ५७ शहातील रुग्णांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तर ७ गोवरच्या रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या पाहता महापालिका लवकरच स्वतंत्र गोवर कक्ष उभारणार आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी एम.आर. शेख यांनी दिली.

जिल्ह्यातही बालकांना गोरवचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नवजात शिशूपासून ते पाच वर्षे वयाच्या बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आली आहेत. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने मोठ्या व्यक्तींना देखील गोवरची लागण होऊ शकते. गोवरचे वाढणारे संक्रमण थोपवण्यासाठी शासनाने रुग्णांचे समीक्षण आणि आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या तुलनेत गोवर संक्रमण अधिक वेगाने पसरते.

यामुळे रुग्णांना वेळेत एमआर व्हॅक्सिन दिली जाणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे संक्रमणाची तीव्र कमी होते. जिल्ह्यात गोवरचे संक्रमण पोहोचले असल्याने जि.प. आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमआर व्हॅक्सिन उपलब्ध करवून दिली आहे. शिवाय या लसीचा मुबलकसाठा उपलब्ध आहे. तर आरोग्य विभागाने पाठवलेल्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे.

आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू
1 ज्या कुटुंबात पाच वर्षांपर्यंतची मुले आहेत. त्यांना गोवर प्रतिबंधात्मक लस दिली किंवा नाही, यासाठी आरोग्य विभागातर्फे घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. ग्रामीण भागात कार्यरत आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य विभागाच्या एएनएम यांना बालकांचे व रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. या शोधमोहिमेचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे.

लस न घेतलेली बालके
2 जिल्ह्यातील २०९६ बालकांनी पहिला आणि २८२० बालकांनी एमएमआर लसीचा दुसरा डोस घेतलेला नसल्याची माहिती आहे. तालुकानिहाय धुळे तालुक्यात ३४१ बालकांनी पाहिला तर ३९६ बालकांनी दुसरा डोस घेतला नाही. साक्री तालुक्यात ६८३ बालकांनी पहिला तर ९३९ बालकांनी दुसरा डोस घेतला नाही. शिंदखेडा तालुक्यात ३४१ पहिला आणि ४७० बालकांनी दुसरा, शिरपूर तालुक्यातील ५२४ पाहिला आणि ७१८ बालकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

संक्रमण १४ दिवस राहते प्रभावी
3 श्वसन यंत्रणेवर विषाणूच्या संक्रमणाने गोवरची लागण होते. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकल्यासारखी लक्षणे आढळून येतात. तसेच ९० टक्के नागरिक ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे आणि जे संक्रमित व्यक्तीसोबत एकाच घरात राहतात, ते या आजाराला बळी पडू शकतात. हे संक्रमण १४ दिवसांपर्यंत प्रभावी राहते. दोन ते चार दिवसांपूर्वी शरीरावर दाणे उमळण्यास सुरुवात होते. अशक्त आणि कुपोषित बालकांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरते.

लसींचा साठा पुरेसा उपलब्ध
गोवर संक्रमणाचे शहरात सात रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून स्वतंत्र गोवर कक्षाची स्थापनचा निर्णय घेणार आहे. नागरिकांनी लक्षणे आढळून येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत. -डॉ. एम.आर. शेख, आरोग्य अधिकारी महापालिका

बातम्या आणखी आहेत...