आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:अभाविपच्या अभ्यास वर्गात‎ 70 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

शिंदखेडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या‎ जिल्हा शाखेतर्फे दोन दिवसीय‎ अभ्यास वर्ग घेण्यात आला.‎ वर्गाचे उद्घाटन प्रा. अमोल‎ मराठे, जळगाव विभाग संघटन मंत्री‎ शुभम स्वामी, जळगाव विभाग‎ संयोजक कल्पेश सोनवणे,‎ अभ्यासवर्ग प्रमुख यश मराठे यांच्या‎ उपस्थितीत झाले. या वेळी शुभम‎ स्वामी म्हणाले की, अखिल‎ भारतीय विद्यार्थी परिषदेने ७५ व्या‎ वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रहिताचे‎ कार्य करणारी विद्यार्थी परिषद ही‎ जगातील सर्वात मोठी संघटना‎ असल्याचे ते म्हणाले.

वर्गात विविध‎ सत्र घेण्यात आले. त्यात अखिल‎ भारतीय विद्यार्थी परिषदेचा परिचय,‎ कार्यपद्धती, कार्यकर्ता व्यवहार,‎ व्यक्तिमत्त्व विकास, सांस्कृतिक‎ कार्यक्रम, महाविद्यालयीन काम,‎ व्यावहारिक प्रशिक्षण, आचार‎ पद्धती व परंपरा आदींचा समावेश‎ होता. अभ्यास वर्गाला शिरपूर,‎ शिंदखेडा, धुळे, साक्री चारही‎ तालुक्यातून ६०-७० विद्यार्थी,‎ विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित‎ होते. समारोप जिल्हा संघटनमंत्री‎ ओमकार मोरे यांच्या उपस्थितीत‎ झाला. या वेळी परिषदेच्या शिंदखेडा‎ तालुक्याची कार्यकारिणी जाहीर‎ झाली.

त्यानुसार शहराध्यक्षपदी प्रा.‎ उमेश चौधरी, उपाध्यक्षपदी प्रा.‎ अतुल पाटील, प्रा. रंजीत गिरासे,‎ शहरमंत्रिपदी यश खैरनार,‎ सहमंत्रिपदी ओम माळी, आरती‎ गवळे, कार्यालय मंत्रिपदी कृष्णा‎ देसले, सोशल मीडिया प्रमुखपदी‎ पार्थ शिंदे, कलामंच संयोजकपदी‎ सर्वजित गिरासे, एसएफडी‎ संयोजकपदी स्वप्निल परदेशी,‎ संयोजकपदी गुंजन जाधव,‎ ज्ञानमंथन प्रमुखपदी महेश चैधरी,‎ अभ्यास मंडळ प्रमुखपदी शुभम‎ धनगर, सदस्यपदी अमोल मराठे,‎ ओमकार मोरे, चंद्रकला गावित,‎ यश मराठे यांची निवड झाली.‎

बातम्या आणखी आहेत...