आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • 72 Engineers In Charge Of Gharkul Scheme Are In Financial Difficulties Due To Non payment Of Honorarium For A Year; Inconvenience Due To Non receipt Of Honorarium |marathi News

आर्थिक विवंचना:घरकुल योजनेचे काम सांभाळणारे 72 अभियंते वर्षभरापासून मानधन नसल्याने आर्थिक अडचणीत; मानधन मिळत नसल्याने होतेय गैरसोय

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनांवर तांत्रिक देखभाल करणाऱ्या अभियंत्याची नियुक्ती सीएससी या खासगी कंपनीकडून करण्यात आली आहे. प्रत्येक घरकुल पूर्ण झाल्यानंतर अभियंत्यांना ७५० रुपये एवढे मानधन मिळते. मागील दोन वर्षांत जिल्हा घरकुल पूर्ण करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र या घरकुल पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या अभियंत्यांना एक वर्षापासून मानधनाची रक्कमच मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी याकरिता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी विविध स्तरावर अर्ज विनंत्या देखील केल्या आहेत.

पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना अशा विविध आवास योजना केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येतात. ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या योजनांवर देखरेख ठेवण्यात येते. घरकुलांच्या स्थानिक पातळीवर तांत्रिक देखरेखीसाठी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अभियंत्यांना प्रत्येक घरकुल पूर्ण झाल्यानंतर ७५० रुपये एवढा अल्प मेहनताना मिळतो. ज्या वेळेस पेट्रोलचे दर ५० रुपये होते. त्या वेळेसदेखील ७५० रुपये एवढा मेहनताना देण्यात येत होता. आज पेट्रोल ११२ रुपये लिटरवर पोहोचले आहे. आज देखील ७५० एवढेच मानधन देण्यात येते. घरकुल पूर्ण करण्यात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. मात्र हे घरकुल पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या अभियंत्यांना जून २०२१ पासून त्यांच्या मेहनतीचे रक्कम अर्थात दरमहा मिळणारे मानधनच मिळालेले नाही. वर्षभरात ८४ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

यामुळे याकरिता अभियंत्यांनीदेखील मोठे परिश्रम घेतले आहे. मात्र त्यांच्या मेहनतीची रक्कम कंपनीकडून अदा करण्यात येत नाही. अभियंत्यांना हक्काचे मानधन मिळावे, याकरिता सीएससी कंपनीकडे पाठपुरावा करत आहेत. या मागणीसाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहेत.

तालुकानिहाय असे आहेत अभियंते
धुळे तालुक्यात १३, साक्री तालुक्यात २३, शिरपूर तालुक्यात २४ आणि शिंदखेडा तालुक्यात १२ अभियंता कार्यरत आहेत. या सर्वच अभियंत्यांची नियुक्ती ही सीएससी या खासगी कंपनीकडून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...