आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त पूर्व परीक्षा:एमपीएससी पूर्वपरीक्षेला 728 परीक्षार्थी गैरहजर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा अायाेगातर्फे शनिवारी शहरातील सात केंद्रांत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातून ३ हजार ४६ परीक्षार्थी प्रविष्ट हाेते. परीक्षेला ७२८ परीक्षार्थी गैरहजर होते. परीक्षेचे नियोजन सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

कमलाबाई हायस्कूलमध्ये ४५६ पैकी १०४, जे.आर. सिटी हायस्कूलमध्ये ४५६ पैकी ९२, शिवाजी हायस्कूलमध्ये ४०८ पैकी १०२, जिजामाता विद्यालयात ४०६ पैकी ११३, न्यू सिटी हायस्कूलमध्ये ४३२ पैकी ९९, कनोसा हायस्कूलमध्ये ४३२ पैकी ११८, जयहिंद हायस्कूलमध्ये ४५६ पैकी १०० परीक्षार्थी गैरहजर हाेते. २ हजार ३१८ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

बातम्या आणखी आहेत...