आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सव:७५ माजी सैनिकांचा सत्कार

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील गाेंदूर येथील प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त ७५ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव वामनराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे धुळे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव यांच्या हस्ते ७५ माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाट्य,नृत्य, लेझीम सादरीकरण केले. माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या सचिव प्रा. शुभांगी निकम, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डी. फार्मसीचे प्राचार्य सागर जाधव, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनंत वाघ, आयटीआयचे प्राचार्य नितीश बडगुजर फिजिकल डायरेक्टर प्रा. विजय पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...