आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध:बंब कुटुंबाच्या लॉकरमध्ये 77 लाख, ‘एफडी’च्या 260 पावत्या आढळल्या

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावकारी ब्लॅक मनी व्हाइटसाठी दुसऱ्याच्या नावे एफडी करण्याचा फंडा

अवैध सावकारीमुळे अटकेत असलेल्या राजेंद्र बंब याच्यासोबत आता त्याचे कुटुंबही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. राजेंद्र बंब याचा भाऊ तथा संशयित संजय बंब व इतरांच्या लॉकरमधून पोलिसांनी सुमारे ७७ लाख ९३ हजारांची रोकड, दागिने जप्त केले आहे. याशिवाय एफडी अर्थात मुदत ठेवीच्या २६० पावत्या आढळल्या आहे. ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी दुसऱ्याच्या नावे एफडी करण्याचा राजेंद्र बंब याचा फंडा होता. सापडलेल्या २६० एफडीची मुदत ठेव रक्कम सुमारे २० लाख रुपये आहे.

अवैध सावकारीमुळे राजेंद्र बंब पोलिस कोठडीत आहे. त्याचा भाऊ संजय बंब पसार झाला आहे. चौकशीत संजय बंब याच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर तीन लॉकर असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार श्रीराम नागरी पतसंस्थेतील लॉकर उघडण्यात आले. त्यात ७७ लाख ९३ हजारांची रोकड, ७ लाख ५१ हजारांचे सुमारे १४९ ग्रॅम सोने, तसेच ४९० कोरे चेक, २४४ कोरे स्टॅम्प तसेच इतर व्यक्तीच्या नावावर असलेल्या सुमारे २६० मुदत ठेवीच्या पावत्या मिळून आल्या. त्यापैकी बहुतांशी एफडी या एकाच कुटुंबातील नागरिकांची नावे आहे. यावेळीही एफडीवर नावे असलेल्या नागरिकांना त्याची माहिती नाही. अवैध सावकारी-कर्ज वसुलीतून जमणारा ब्लॅक मनी व्हाइट करून घेण्यासाठी या एफडीचा उपयोग गेला जात होता. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी याबाबत माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हेंमत बेंडाळे, हर्षवर्धन बहिर, हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गिते, उपनिबंधक मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

बंब सांगतो दंतकथा, वेळ नेताे मारून
एवढा पैसा आला कोठून या प्रश्नाला राजेंद्र बंब याला सामोरे जावे लागते आहे. शिवाय आयकर विभागही हाच प्रश्न उपस्थित करणार आहे; परंतु त्यासाठी राजेंंद्र बंब हा नेहमीच काही तरी सांगतो. त्याने सांगितलेली कपोलकल्पित कथा मात्र वस्तुस्थिती अन् पुराव्यांशी साधर्म्य साधणारी नाही. थोडक्यात बंब वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो.

चौथ्या गुन्ह्यात मिळाली कोठडी
राजेंद्र बंब याच्या विराेधात शहर पोलिस ठाण्यात विलास ताकटे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. गुरुवारी बंब याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर बंब याचा ताबा द्यावा, अशी विनंतीवजा अर्ज शहर पोलिसांनी दिला. त्यानुसार उद्या शुकवारी पोलिस बंब याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

लॉकरमध्ये पुन्हा मुदत ठेवीच्या सुमारे २० लाखांच्या पावत्या आढळल्या रोकड, ७ लाख ५१ हजारांचे सुमारे १४९ ग्रॅम सोने, तसेच ४९० कोरे चेक, २४४ कोरे स्टॅम्प तसेच इतर व्यक्तीच्या नावावर असलेल्या सुमारे २६० मुदत ठेवीच्या पावत्या मिळून आल्या. त्यापैकी बहुतांशी एफडी या एकाच कुटुंबातील नागरिकांची नावे आहे. यावेळीही एफडीवर नावे असलेल्या नागरिकांना त्याची माहिती नाही. अवैध सावकारी-कर्ज वसुलीतून जमणारा ब्लॅक मनी व्हाइट करून घेण्यासाठी या एफडीचा उपयोग गेला जात होता. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी याबाबत माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हेंमत बेंडाळे, हर्षवर्धन बहिर, हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गिते, उपनिबंधक मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

शहरातील श्रीराम नागरी पतसंस्थेतील लॉकर उघडण्यात आल्यावर त्यातून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने. लॉकरमध्ये एफडीच्या पावत्याही आढळून आल्या.