आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून‎ जिल्ह्यासाठी 80 कोटींचा निधी‎

धुळे‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे व शिंदखेडा तालुक्यासह मालेगाव‎ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या‎ सक्षमीकरणासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे‎ यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक‎ योजनेतून ८० कोटी रुपये मंजूर झाले आहे. या‎ निधीतून १०५ किलोमीटर रस्त्यांचे‎ सक्षमीकरण होणार आहे.‎ धुळे, शिंदखेडा, मालेगाव, बागलाण‎ तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांचा समावेश‎ प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात‎ आला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेत‎ रस्त्यांचा समावेश व्हावा यासाठी खासदार‎ डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय ग्रामविकास‎ मंत्री गिरिराज सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन‎ यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार धुळे‎ तालुक्यातील शिरूड- विंचूर ते दोंदवाड‎ रस्त्यासाठी ५ कोटी ५८ लाख,‎ बाळापूर-वडजाई ते पिंप्री रस्त्यासाठी ५ कोटी‎ १६ लाख, निमडाळे ते खेडे रस्त्यासाठी ४‎ कोटी ९८ लाख, वडजाई ते नरव्हाळ‎ रस्त्यासाठी २ कोटी ९० लाख, नेर ते कावठी‎ रस्त्यासाठी ५ कोटी ६२ लाख, शिंदखेडा‎ तालुक्यातील शिंदखेडा ते वरुळ रस्त्यासाठी‎ २ कोटी ७९ लाख, राज्य महामार्ग तीन ते‎ माळीच ते कलमाडी ते वाघाडी बुद्रुक ते‎ कंचनपूर रस्त्यासाठी ११ कोटी ८० लाख,‎ हुंबर्डे ते पाष्टे ते बेटावद रस्त्यासाठी ९ कोटी‎ ४६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्यांची‎ कामे झाल्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी‎ मदत होणार आहे. या रस्त्यांचे काम करावे,‎ अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती.‎

बातम्या आणखी आहेत...