आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वित्त कंपनीला 81 हजारांचा घातला गंडा

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या वित्त कंपनीकडून कर्ज घेतल्यानंतर परतफेड न करता परस्पर शेत विक्री करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वित्त कंपनीचे कर्मचारी हेमंत देविदास कुलकर्णी (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार धोंडी शिवारात गट क्र. ९७/१/अ मध्ये लीलाबाई बन्सीलाल पाटील व भूषण बन्सीलाल पाटील (दोघे रा. नगाव) यांची शेतजमीन आहे. या जमिनीसाठी कर्ज घेण्यात आले होते. कर्जाची परतफेड न करता दोघांनी ही शेती दशरथ देवमन पाटील (रा. नगाव) यांना विक्री केली. त्यातून सुमारे ८१ हजारांचा गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...