आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मैदानी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ८७ खेळाडू विजयी झाले. ते धुळ्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग नोंदवला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व साक्री तालुका क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या हस्ते झाले. या वेळी गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक अजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, विस्तार अधिकारी व्ही. व्ही. पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गिते उपस्थित होते. स्पर्धेत तालुक्यातील ५० शाळेतील ९०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यात ३२५ मुली व ५७५ मुलांचा समावेश होता. १००, ४००, ८००, १५०० मीटर धावण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू ११ ऑगस्टला जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सहभागी होतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.