आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना शासनाच्या आदेशानुसार ५० हजार रुपये अनुदान दिले जाते आहे. त्यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ८०८ मृतांच्या वारसांना ९ कोटी ४ लाखांचे वितरण झाले आहे. जिल्ह्यातून १ हजार १४४ प्रस्ताव रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर केंद्र शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली. त्यानूसार वारसांना अर्थसाहाय्य दिले जात आहे. यासंदर्भातील अटी, शर्तीमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णालयात किवा घरी मृत्यू झाला असेल व नोंदणी केलेली नसेल तरीही अर्थसाहाय्य देण्यात येते.
या योजनेंतर्गत वारसांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे ते बँकेचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातून कोरोना अनुदानासाठी ३ हजार १९० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ८०८ अर्ज मंजूर झाले असून संबंधितांच्या खात्यात ९ कोटी ४ लाख रुपये जमा झाले आहे. धुळे ग्रामीण क्षेत्रातून ९९४ पैकी ४७४ अर्ज नामंजूर तर ४८१ मंजूर झाले. धुळे महापालिका क्षेत्रातून २ हजार १९६ पैकी १ हजार ३२७ अर्ज मंजूर तर ६७० अर्ज नामंजूर झाले. तसेच १७८ अर्ज प्रलंबित असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे कोरोनामुळे ७२८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात धुळे ग्रामीण क्षेत्रात ४१२ तर धुळे महापालिका क्षेत्रात २६४ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाचा घरी मृत्यू झाला तरीही अनुदान देण्यात येते. त्यामुळे अनुदानासाठी अर्ज वाढले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.