आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेयवाद:पांझरा नदीवर नव्या पुलासाठी 9 कोटी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर असलेला मोठा ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या भागातील वर्दळ लक्षात घेता या पुलाजवळ नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ९ कोटी रुपये राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाले आहे. पुलासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार फारुख शाह दोघांनी केला आहे.

धुळे शहर आणि देवपूरला जोडण्यासाठी पांझरा नदीवर सद्य:स्थितीत ९ पूल आहे. त्याचबरोबर प्रभातनगर जवळ नव्याने दोन पूल निर्माणाधीन आहे. नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला ११३ वर्षे पूर्ण झाले आहे. हा पूल जुना झाला असल्याने काही दिवसांपासून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ही बाब लक्षात घेऊन या पुलाजवळ नवीन पूल व्हावा यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच १४ कोटींची मागणी केली होती. शासनाने ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी न करता या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ९ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

आमदार शाह म्हणतात मी मंत्र्यांना भेटलो होतो
पांझरा नदीवरील जुना पूल बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची १६ नोव्हेंबरला भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात नवीन पुलासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद झाल्याचा दावा आमदार शाह यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...