आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदान:9 सर्पांना जीवदान; सोडले लळिंगला

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत सर्पमित्रांनी ९ सर्पांना पकडून सुरक्षित वनहद्दीत सोडत जीवनदान दिले. त्यात काही विषारी सर्पांचा समावेश आहे. शहरातील नगावबारी, जुने धुळे, नगाव, मोराणे तसेच इतर ठिकाणी सर्प आढळून आले.

वेदांत बहाळकर, दत्तात्रय मोरे, दुर्गेश जाधव, हर्षल पाटील, हर्षल फुलपगारे या सर्पमित्रांनी त्यांना पकडले. त्यात अजगर, मांडूळ, नानेटी, चित्रांग, नायकुळ, धामण, तस्कर, दिवट, नाग, फुरसे या सर्पांचा समावेश होता. सर्पांना लळिंग कुरणात सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...