आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र अॅम्युचर नेटबॉल असोसिएशनतर्फे २२ ते २४ एप्रिलदरम्यान बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात १५वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यासाठी मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानात निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेत ९७ खेळाडू सहभागी झाले.
जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनतर्फे ही निवड चाचणी स्पर्धा झाली. चाचणीत मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी विद्यालय, सेंट अॅन्स इंग्लिश स्कूल, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, केंद्रीय विद्यालय, सेंट अॅन्थनी इंग्लिश स्कूल, न्यू सिटी हायस्कूल, झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, कनोसा स्कूल, जयहिंद इंग्लिश स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जयहिंद हायस्कूलमधील ९७ खेळाडू सहभागी झाले होते. निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक विनायक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विलास बोरसे, आकाश शिंदे, खो-खो खेळाडू अविनाश वाघ, राहुल एच. पाटील, नेटबॉल असोसिएशनचे सचिव योगेश वाघ, अविनाश पाटील, ऋत्विक ठाकूर, हर्षल भदाणे, मयूरी जाधव, सोनिया गावडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.