आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा तालुक्यातील ९७८ घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू न करणे, विहित मुदतीत घरकुलाचे काम पूर्ण न करणे व घरकुलासाठी मिळालेले अनुदान इतरत्र खर्च करणे, अशा विविध कारणासाठी पंचायत समिती प्रशासनाने नोटीस बजावले आहेत. दरम्यान, यानंतर लाभार्थ्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर लोकअदालतीत न्यायाधीशांपुढे उभे केले जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना,शबरी आवास व रमाई आवास केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील गरजु लोकांना घरकुलांचा लाभ दिला जातो.तळोदा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना //"ब//" यादीत सन २०१६ - २०१७ ते २०२० २०२१ या आर्थिक वर्षात एकुण १०६२१ घरकुले मंजुर आहेत.
त्यापैकी ९४२९ घरकुले पुर्ण असुन १९७५ घरकुले अपूर्ण आहेत. २६६ घरकुले अद्याप सुरु झालेली नाहीत.तर प्रधानमंत्री आवास योजना योजना //"ड//" यादीसाठी सन २०२१-२०२२ या अर्थिक वर्षात एकूण २२१९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यापैकी २०९३ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. १२६ घरकुलांना मंजुरी देण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी ४७१ घरकुले पुर्ण झालेली असुन सुमारे दीड हजर घरकुले अपूर्ण आहेत. जवळपास ६०० घरकुले अद्याप सुरु झालेली नाहीत.
शबरी आवास योजना अंतर्गत सन २०१६ - २०१७ ते २०२१ २०२२ या आर्थिक वर्षात शबरी आवास योजनेतंर्गत एकुण १४६१ घरकुले मंजूर करण्यात आलेली होती. त्यापैकी ११०५ घरकुले पुर्ण असुन ३३९ घरकुले अपुर्ण आहेत. ९० घरकुले अद्याप सुरु झालेली नाहीत.रमाई आवास योजनेत सन २०१६ - २०१७ ते २०२१ २०२२ या आर्थिक वर्षात रमाई आवास योजनेतंर्गत एकुण २४६ घरकुले मंजुर असुन पैकी २०६ घरकुले पुर्ण असून ३३ घरकुले अपूर्ण आहेत.
घरकूल पूर्णत्वाला प्राधान्य जिल्ह्यात सर्वत्र अपूर्ण घरकुल असणाऱ्या लाभार्थ्यांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यासाठी जवळपास १० हजार नोटिसांची छपाई करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्याकडून घरकुल पूर्णत्वाला प्राधान्य देण्यात येत आहे. राजेंद्र पाटील, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदुरबार
आदेशानुसार पुढील कारवाई तळोदा तालुक्यात एकूण ९७८ लाभार्थ्यांना घरकुल अपूर्ण असल्याचे नोटिस बजावण्यात आलेले आहेत. पुढील काळात त्यांनी घरकुलाचे काम पूर्ण न केल्यास प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू परशुराम कोकणी, गटविकास अधिकारी, तळोदा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.