आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दळणवळण:पांझर नदीवर माेराणे गावातील पुलाने १५ किमी फेरा वाचणार

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील मोराणे प्र. नेर येथे पांझरा नदीवर ८ कोटी ५० लाख रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. आमदार पाटील यांनी स्वत: बैलगाडी चालवत पूल वाहतुकीसाठी खुला केला. या पुलामुळे मोराणे-अकलाड येथील ग्रामस्थांचा १५ किमी फेरा वाचणार असून, दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे.

या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी सभापती भगवान गर्दे, कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, कार्याध्यक्ष अशोक सुडके, पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, संचालक बापू खैरनार आदी उपस्थित हाेते. या वेळी जामदार कुणाल पाटील म्हणाले की, दळणवळणात रस्ते आणि पुलांचे महत्त्व माेठे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामावर लक्ष देण्यात आले आहे. मोराणे आणि अकलाड येथील शेतकरी व ग्रामस्थांची पांझरा नदीवर पूल व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे या पुलाचे काम करण्यास प्राधान्य दिले. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने निधी मंजूर केल्यावर पुलाचे काम वेगात केले. शिक्षण, आरोग्याकडे अधिक लक्ष दिले जाते आहे. तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. निधीची कमतरता पडणार नाही यासाठी प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले. सुनील ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...