आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पोलिस कर्मचारी शिवराज रोहिदास पाटील ( वय ३५) यांचा सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी ते कर्तव्यावर होते. शिवराज पाटील तालुक्यातील मांजरोद येथील रहिवासी आहे.तालुक्यातील मांजरोद येथील शिवराज पाटील २००८ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. कामाची चुणूक पाहून वरिष्ठांनी त्यांची नियुक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी केली होती. या काळात त्यांचे वडील रोहिदास पाटील यांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांची शिरपूर येथे बदली झाली. ते सोमवारी नेहमीप्रमाणे डीवायएसपी कार्यालयात कर्तव्यावर होते. त्या वेळी त्यांना उलटी झाल्याने अस्वस्थ वाटू लागले.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनतंर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिवराज पाटील एकुलते एक होते. त्यांच्यावर मांजरोद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व सहा वर्षाची मुलगी आहे.
उच्च रक्तदाब, कोलेस्टेराॅल वाढणे आरोग्यासाठी धोकेदायक
धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, उच्च रक्तदाब, कोलेस्टेराॅल वाढल्याने तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. शरीराच्या वरच्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे, जास्त घाम येणे, थकवा, मळमळ आणि उलट्या होणे, छातीत अचानक दुखणे असे लक्षण असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. - डॉ. अमित गुजराती, शिरपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.