आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकावरच वार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वडजाईरोड परिसरातील व्यक्तीकडे थकीत कर्जाचा हप्ता वसुलीसाठी आलेल्या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरवर सुऱ्याने हल्ला करण्यात आला. तसेच त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडजाईरोड परिसरातील अबररी मशिदीजवळ मलिका उस्मान खाटीक हे कुटुंबासह राहतात. या कुटुंबाने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते.

त्याचे हप्ते थकीत होते. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक नीलेश कैलास चौधरी (वय २३, रा. पंचवटी, ग. नं ८ ) हे खाटीक यांच्या घरी आले होते. त्याचा राग आल्यामुळे मलिका खाटीक यांच्या मुलाने वाद घातला. शिवीगाळ, दमदाटी करत त्याने नीलेश चौधरी यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर व छातीवर दांड्याने वार केला. त्यानंतर मटण कापण्याच्या सुऱ्याने नीलेश चौधरी यांच्या हातावर वार करण्यात आला. चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...