आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:दुरुस्तीसाठी शंभर रुपयांची लाच ; शिंदखेडा तहसीलच्या अव्वल कारकुनास लाच घेताना अटक

शिंदखेडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केली.गणेश दिगंबर पिंगळे (वय ५२, रा. सूर्योदय कॉलनी देवपूर, धुळे) असे अटक केलेल्या कारकुनाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या आईचे नाव मतदार यादीत चुकीचे नमूद आहे.

त्यामुळे त्यांच्या आईस मतदान करण्यास तसेच निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. मतदार यादीतील आईचे नाव दुरुस्त करण्यासाठी दोन्ही नावाचे व्यक्ती एकच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रावर नमूद माहिती साक्षांकन करण्याचे मोबदल्यात आरोपी अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी शंभर रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पडताळणी होऊन सापळा रचण्यात आला. आरोपीला लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...