आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पपईचा दर:शेतकरी, व्यापाऱ्यांची समिती गठीत करून केळीसह पपईचा ठरवणार दर

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी फळबागायतदार शेतकऱ्यांना भावावरून अडचण निर्माण होते. त्याचे संघर्षात रूपांतर होते. संघर्षाचे रूपांतर संपामध्ये होते. यामुळे शेतकऱ्यांचा मालाचे नुकसान होते. शिवाय अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये तसेच त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी दहा शेतकरी, दहा व्यापाऱ्यांची समिती स्थापन करून समन्वयाने भाव ठरवला जाईल. तसेच देशातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे पपईचे दर मागितले जातील, असा निर्णय प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा केळी व पपई ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बैठक संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाचा मैदानावर शनिवारी झाली. नंदुरबार जिल्हा केळी व पपई उत्पादक संघाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अभिजीत मोतीलाल पाटील होते. व्यासपीठावर अनिल पाटील कुकडेल, दीपक पाटील वडाळी, पुरुषोत्तम चव्हाण मोड, बुदरभाई पाटील करजई, कांतिलाल पाटील जवदा, मुकेश पाटील शहादा, लक्ष्मण पाटील जयनगर,धनराज माटकुट बोराला उपस्थित होते.

रोपे, बियाणे खरेदीची फसवणूक टाळावी
अभिजित पाटील म्हणाले, दरवर्षी शेतकऱ्यांना भावावरून अडचण निर्माण होते. त्यात त्यांना संघर्ष करावा लागतो. वेळोवेळी संपही करावा लागतो. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होते. त्यांचा वेळही वाया जातो. तसेच शेतकरी फळ लागवडीसाठी रोपे खरेदी करतात. त्यात बोगस बियाणे मिळते. त्यात देखील शेतकऱ्याची फसवणूक होते. कृषी अधिकारी यांच्याकडे शासनाच्या अनेक लाभदायक योजना आहेत त्याचाही फायदा शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. शेती करताना आर्थिक नियोजन बरोबर राहिले तर शेतकऱ्याला त्याच्या फायदा होतो, असे सांगितले.

राजकारण बाजूला; शेतकरी हिताचा विचार
माझ्या शेत मालाची किंवा फळाची किंमत व्यापारी ठरवतात. हे कितपत योग्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणून प्रामाणिकपणाची गरज आहे. शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळालेला आहे. म्हणून फळ बागायतदार संघाकडे सर्व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांचे त्याचा विचार केला जाईल, असे हरी दत्तू पाटील म्हणाले.

व्यापाऱ्यांची पोलिसांकडून पडताळणी व्हावी
जिल्ह्यासह राज्यात अनेक शेतकरी बांधवांची फसवणूक होते. अनेक व्यापारी पैसै बुडवून फरार होतात. शेतकरी पोलिसात धाव घेतो; परंतु उपयोग होत नाही. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय नसल्याने हे सर्व प्रकार घडत आहेत. यासाठी पोलिस विभागाकडून व्यापाऱ्यांची पडताळणी करून मगच त्यांना पपई दिली पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, असे अभिजित पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...