आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी रविवारी रात्री नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री दहा वाजेनंतरही भाविक रस्त्यावर होते. शहरातील गणेश मंडळांच्या आरास तिसऱ्या दिवसापासून खुल्या झाल्या आहे. त्यानंतर काल शनिवार आणि रविवार सुटी असल्याने आरास पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मित्र, नातेवाइकांकडे महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी आरास पाहण्यास प्राधान्य दिले होते.

त्यामुळे खाेलगल्ली, पाचवी गल्लीसह अष्टविनायक मंडळ, भगवा चाैक, हिंदू एकता आंदाेलन मंडळाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी हाेती. फुलवाला चाैकातील मंडळाने साकारलेली सुवर्ण मंदिराची प्रतिकृती, गल्ली क्रमांक चारमधील जय भाेले ग्रुपचा केदारनाथ धामचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

प्रमुख भागातील रस्ते विद्युत राेषणाईने उजळले
यंदा बहुतांश मंडळांनी आकर्षक रोषणाई केली आहे. त्यामुळे रस्ते उजळले असून, वेगवेगळ्या रंगाची रोषणाई नागरिकांची लक्ष आकर्षित करून घेते आहे. गल्ली क्रमांक चार, पाच, सहा, जेबीरोड, सराफ बाजार भागात आकर्षक रोषणाई आहे.

बातम्या आणखी आहेत...