आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:नगर भूमापन विभागाच्या विरोधात अधिकाऱ्यांकडे दररोज एक तक्रार ; चुकीच्या नोंदी रद्द होण्याची शक्यता

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर भूमापन कार्यालयाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांसह चौकशी अधिकाऱ्यांकडे रोज एक तक्रार प्राप्त होत होती. तसेच महसूल विभागाने केलेल्या चौकशीत चुकीच्या नोंदी असल्याचे समोर आले आहे. प्रमाण नसलेल्या नोंदी रद्द करण्याची शिफारस चौकशी पथकाने केली आहे. त्यामुळे आता जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून चौकशी झाल्यावर वाढीव क्षेत्रफळाच्या चुकीच्या नोंदी रद्द होण्याची शक्यता आहे. नगर भूमापन कार्यालयात अडीच महिन्यापूर्वी चौकशी सुरू झाली. चौकशी करताना प्रशासकीय आणि राजकीय दबाव वाढू नये यासाठी प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. चौकशी सुरू असताना आणि तत्पूर्वी नगर भूमापन कार्यालयाच्या विरोधात रोज एक तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच चौकशी अधिकाऱ्यांकडे दाखल होत होती. अद्यापही तक्रारींचा ओघ सुरूच आहे. अडीच महिने चौकशी केल्यानंतर हाती आलेली माहिती चक्रावणारी आहे. जमावबंदी आयुक्त कार्यालयाने तटस्थपणे चौकशी केली तर नगर भूमापन कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस येईल. नगरभूमापन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून विकसकांनी नोंदी मंजूर करून घेतल्या आहे. साधारण दीड ते दोन हजार नोंदीत अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन क्षेत्रफळात वाढ केली आहे. अधिकार क्षेत्राबाहेर केलेल्या या नोंदी रद्द करण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...