आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आनंदाचा शिधा; दिवाळी संपली साखरेची प्रतीक्षा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शंभर रुपयांत चार वस्तू अर्थात आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता. मात्र, जिल्ह्यात साखर कमी उपलब्ध झाल्याने अनेक रेशनकार्ड धारकांना तीनच वस्तूंचे वाटप झाले. अद्याप नाेंदवलेल्या मागणीपैकी ४५ टक्के साखरेचा पुरवठा झालेला नाही. उर्वरित तीन वस्तूंचे ८० टक्के वाटप करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. येत्या आठ ते दहा दिवसांत साखरेचा पुरवठा हाेईल.

राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय उशिरा जाहीर झाला. या वस्तू देण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याची छबी असलेल्या पिशव्या छापण्याच्या प्रक्रियेत वेळ गेला. दिवाळीला केवळ चार दिवस बाकी असताना वस्तूंचा पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून झाला. त्यानंतर प्रशासनाने उपलब्ध वस्तूंचे वाटप केले. मात्र, एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात वस्तूंचा पुरवठा करावयाचा असल्याने संबंधित ठेकेदाराची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेक जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणावर वस्तूंचा पुरवठा झाला.

जिल्ह्याला साखरचे पुरवठा कमी झाला. त्यामुळे चार एेवजी केवळ तीन वस्तू रेशनकार्ड धारकांना वाटप करण्यात आल्या. साखर नंतर दिली जाणार आहे. जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ९१६ क्विंटल साखरची मागणी नाेंदवण्यात आली हाेती. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ६५ हजार ६७१ साखरेचे पाकीट प्राप्त झाले आहे. अद्यापही १ लाख ३३ हजार २९५ साखरेच्या पाकिटांची प्रतीक्षा आहे. एकूण मागणीच्या ५५.४१ टक्के साखर जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. अद्यापही ४४.५९ टक्के साखर मिळालेली नाही.

१५ नोव्हेंबरपर्यंत वाटप पूर्ण हाेईल...
साखरेचा कमी साठा उपलब्ध झाला आहे. मात्र, दिवाळीनंतर दाेन ट्रक साठा प्राप्त झाला आहे. लवकरच उर्वरित साठा मिळणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सारखेचे वाटप पूर्ण केले जाईल. दिवाळीपूर्वी जवळपास ६० टक्के वाटप पूर्ण झाले हाेते. पात्र रेशनकार्ड धारकांना शासनाच्या निर्णयाप्रमाणे सर्व वस्तू देण्यासाठी प्रयत्न होतील. साखर प्राप्त व्हावी यासाठी शासनाकडे काही दिवसांपासून पाठपुरावाही सुरू आहे. -रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...